Swami Samarth Tarak Mantra
Complete lyrics with original text, transliteration, and meaning, 6 sections
Original
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः
Verse 2
Original
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
Verse 3
Original
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
Verse 4
Original
उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
Verse 5
Original
खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त । आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
Verse 6
Original
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।